mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Raghav Chadha joins BJP | आपमध्ये फूट; राघव चड्ढांसह ७ खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

शेअर करा :

Raghav Chadha joins BJP : नवी दिल्लीत आम आदमी पक्षात मोठी फूट. राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश; केजरीवालांचा संताप.

Raghav Chadha joins BJP

नवी दिल्ली : आम आदमी पक्षात (आप) मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. त्यांच्या सोबत खासदार संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

👉 हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून केंद्रावर टीका; मतदारसंघ पुनर्रचनेचा आरोप – यशोमती ठाकूर

पत्रकार परिषदेत बोलताना राघव चड्ढा यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी भारतीय संविधानातील तरतुदींनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि स्वाक्षरी केलेले पत्र राज्यसभा अध्यक्षांकडे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

“आपचे १० पैकी सात खासदार आमच्यासोबत” — चड्ढा

राघव चड्ढा यांनी दावा केला की, राज्यसभेत आपचे एकूण १० खासदार असून त्यापैकी दोन-तृतीयांशाहून अधिक सदस्य त्यांच्या सोबत आहेत. त्यांनी सांगितले की, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल हे देखील त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत.

👉 हे देखील वाचा : महिला आरक्षणावरून भाजपावर काँग्रेसची टीका; परभणीत खा. रविंद्र चव्हाण यांचे वक्तव्य

भाजपमध्ये जाणारे खासदार:

१) राघव चड्ढा
२) संदीप पाठक
३) राजेंद्र गुप्ता
४) विक्रम साहनी
५) स्वाती मालीवाल
६) हरभजन सिंग
७) अशोक मित्तल

“गुन्ह्यांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते” — चड्ढा

आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना चड्ढा म्हणाले, “पक्षाच्या कार्यातून दूर राहण्यामागचे कारण म्हणजे मला त्यांच्या कथित गुन्ह्यांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. माझ्यासमोर दोनच पर्याय होते, राजकारण सोडणे किंवा सकारात्मक राजकारणासाठी ऊर्जा वापरणे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला.”

केजरीवालांचा संताप; ‘ऑपरेशन लोटस’वर आरोप

दरम्यान, या घडामोडींवर आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर टीका करत हा पंजाबच्या जनतेसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले.

या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

— प्रतिनिधी महालोकवार्ता

👉 राजकारणाशी निगडीत महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : राजकारण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको