mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Leopard sighting Balapur Tamsi river area | बाळापूरात नदीकाठावर बिबट्याचे दर्शन; तामसी परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीती

शेअर करा :

Leopard sighting Balapur Tamsi river area : बाळापूर तालुक्यातील तामसीजवळ मन नदीकाठावर बिबट्या दिसल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.

Leopard sighting Balapur Tamsi river area

बाळापूर : तालुक्यातील तामसी परिसरात मन नदीच्या काठावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामसी येथील एक शेतकरी सकाळच्या सुमारास शेतात जात असताना नदीकाठच्या दाट झाडीतून अचानक बिबट्या बाहेर पडल्याचे त्यांना दिसले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

सध्या शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असल्याने सकाळच्या वेळेत शेतकरी व मजूरांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असल्याने संभाव्य धोका वाढला आहे. यापूर्वीही तामसी, चिंचोली आणि पिंपळगाव परिसरातील शेतशिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे.

👉 हे देखील वाचा : बाळापुर–वाडेगाव रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू

या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांकडून वनविभागाकडे वारंवार बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाने शोधमोहीम राबवली असली तरी अद्याप बिबट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे अचानक हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, एखादी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको