mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

गंज बाजारात अतिक्रमणावर कारवाई; आयुक्त यशवंत डांगे यांची थेट पाहणी | Encroachment Removal Ahilyanagar

शेअर करा :

Encroachment Removal Ahilyanagar : अहिल्यानगरच्या गंज बाजार परिसरात महानगरपालिकेने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली. या कारवाईनंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत विक्रेत्यांना इशारा दिला.

Encroachment Removal Ahilyanagar

 

अहिल्यानगर : शहरातील गंज बाजार परिसरात अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करत अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले.

या कारवाईदरम्यान फळ विक्रेत्यांच्या गाड्या तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांनी दुकानाबाहेर केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. गंज बाजार हा शहरातील प्रमुख व अत्यंत गर्दीचा भाग असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

Encroachment Removal Ahilyanagar

अतिक्रमणामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक संकुचित झाले होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. याशिवाय पार्किंगची समस्या देखील गंभीर बनली होती.

वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना मोकळी व सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. संबंधित विक्रेत्यांना भविष्यात अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा

यापुढे कोणतेही अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

🖊️ — प्रतिनिधी, महालोकवार्ता 

👉 अहिल्यानगर व परिसरातील ताज्या घडामोडींसाठी वाचा – महाराष्ट्र

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको