mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अकोला मनपा स्थायी समितीत गोंधळ; भाजप-शिंदे शिवसेना आमने-सामने | Akola Municipal Standing Committee Clash

शेअर करा :

Akola Municipal Standing Committee Clash : अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विकासकामांच्या मुद्द्यावरून गोंधळ. भाजप आणि शिंदे शिवसेना आमने-सामने; पोलिस मध्यस्थीने प्रसंग टळला.

Akola Municipal Standing Committee Clash

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवार १३ एप्रिल रोजी मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. विकासकामांच्या दर्जाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील पदाधिकारी आमने-सामने आल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडत होती. यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांच्यात तीव्र वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन परिस्थिती चिघळल्याचे समजते. बैठकीदरम्यान वाद इतका वाढला की दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे सांगितले जाते. या वेळी उपस्थित सदस्य आणि पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. भाजपचे गटनेते पवन महले यांनीही हस्तक्षेप करत संभाव्य हाणामारी टाळल्याची माहिती आहे.

Akola Municipal Standing Committee Clash

निलंबनाचे आदेश; सदस्याला बाहेर काढले

दरम्यान, बैठकीत गोंधळ वाढल्याने संबंधित सदस्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. या कारवाईनंतर सभागृहात काही काळ तणाव कायम होता.

Akola Municipal Standing Committee Clash

शिवीगाळीचे आरोप; प्रतिक्रिया नाही

या घटनेदरम्यान शिवीगाळ झाल्याचा आरोप सागर भारुका यांनी केला आहे. मात्र या प्रकरणावर सत्ताधारी पक्षाकडून किंवा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

👉 अकोल्यासह परिसरातील ताज्या अपडेट्स साठी वाचा – विदर्भ

सभेमध्ये सागर भारूका हे मागच्या बैठकीतून बैठकीतून निघूल गेले होते. मागच्या बैठकीची चर्चा आज होऊ शकत नाही. मागच्या बैठकीचा विरोध आज कसा नोंदविला जाईल. ते ज्या अधिकाऱ्यांबद्दल वारंवार बोलतात, अधिकाऱ्याला दडपणात घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना १५ दिवसांसाठी निलंबित केले आहे.
– विजय अग्रवाल, सभापती, स्थायी समीती, मनपा, अकोला

 

महापालिका परिसरात तणाव; पोलिस बंदोबस्त वाढवला

घटनेनंतर महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती लक्षात घेता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील या वादामुळे दोन्ही पक्षांतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यांच्या चोऱ्या आता चालत नाहीत. त्यावर प्रश्न विचारले तर सभापतींनी शिविगाळ केली. सभागृहात अशी भाषा त्यांना शोभत नाही. ते जबाबदारीने काम करत नाहीत.
– सागर भारूका, नगरसेवक, शिवसेना (शिंदेगट), अकोला

 — प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 राज्यातील राजकारणातील घडामोडी जाणून घ्या – राजकारण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको