Maharashtra HSC Result 2026 division wise percentage : महाराष्ट्र बारावी (HSC) निकाल 2026 जाहीर झाला असून एकूण निकाल 89.79% लागला आहे. कोकण विभाग अव्वल तर लातूर सर्वात मागे. विभागनिहाय संपूर्ण निकाल येथे वाचा.


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून परीक्षा घेण्यात आली होती आणि या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले होते.
👉 हे देखील वाचा : मोबाईलवर अचानक इमर्जन्सी अलर्ट का आला? भारतात Cell Broadcast System सुरू
यंदाच्या निकालात नियमित (Fresh Regular), खासगी (Private) आणि पुनर्परीक्षार्थी (Repeater) अशा सर्व गटांचा समावेश आहे. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल समाधानकारक राहिला असून राज्याच्या एकूण निकालात त्यांचा मोठा वाटा आहे. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. निकाल जाहीर होताच राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कोकणची बाजी, लातूरला धक्का
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने 94.14 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर पुणे विभाग 91.25 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती, नाशिक, मुंबई आणि कोल्हापूर या विभागांनीही 90 टक्क्यांच्या आसपास निकाल नोंदवत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के इतका राहिल्याने तो राज्यात सर्वात मागे राहिला आहे.
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
कोकण : 94.14%
पुणे : 91.25%
अमरावती : 90.92%
नाशिक : 90.72%
मुंबई : 90.08%
कोल्हापूर : 89.97%
छत्रपती संभाजीनगर : 88.68%
नागपूर : 88.67%
लातूर : 84.14%
पारदर्शक मूल्यमापन आणि तांत्रिक प्रक्रिया
मंडळाकडून उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आले. परीक्षा केंद्रांवर CCTV द्वारे देखरेख ठेवण्यात आली होती, तर निकाल जाहीर करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून मिळाली.
👉 हे देखील वाचा : गडचिरोलीत ७७ वर्षांनंतर जिल्हाधिकाऱ्यांची बीनागुंडा-लाहेरी भेट | विकासाला चालना
पुढच्या टप्प्यात पडताळणी आणि प्रवेश प्रक्रिया
निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका पडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, विविध पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणांनुसार योग्य पर्याय निवडण्याचे आवाहन शिक्षणतज्ज्ञांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा
बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या निकालावर पुढील शिक्षणाचे दिशानिर्देश ठरतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी हा निकाल आनंदाचा तर काहींसाठी आत्मपरीक्षणाचा क्षण ठरला आहे.
यंदाचा निकाल समाधानकारक असला तरी काही विभागांमध्ये घट दिसून आली आहे. कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर लातूर विभागाला निकालात मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


