mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

बुलढाण्यात युवकाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी फरार, शहरात खळबळ | Buldhana murder case

शेअर करा :

Buldhana murder case : बुलढाणा शहरातील बाजारलाईन परिसरात 38 वर्षीय युवक पप्पू उर्फ सागर जाधव याची धारदार शस्त्राने हत्या. आरोपी फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू.

Buldhana murder case
बुलढाणा : शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली असून, ३८ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी उशिरा रात्री बाजारलाईन परिसरात ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.

👉 हे देखील वाचा : अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सक्तीच्या रजेवर

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमजयंती उत्सवाची मिरवणूक शांततेत पार पडली होती आणि नागरिक घरी परतत होते. याच दरम्यान प्रभाग क्रमांक दोन येथील पप्पू उर्फ सागर भाऊराव जाधव हा युवक बाजारलाईनमधील एका दुकानाजवळ उभा होता.

यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीने अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पप्पू गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

👉 बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ

दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 राज्यातील गुन्हे विषयक महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : गुन्हे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको