mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; १२ शिकारी जेरबंद, शेकरूसह दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त | Wildlife Hunting Case Gadchiroli Forest Action

शेअर करा :

Wildlife Hunting Case Gadchiroli Forest Action : गडचिरोलीतील आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने धडक कारवाई करत १२ शिकाऱ्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून शेकरू, उडनारी खार व इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त; वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू.

Wildlife Hunting Case Gadchiroli Forest Action
गडचिरोली : आलापल्ली वनपरिक्षेत्रात वन्यजीवांवर डोळा ठेवणाऱ्या शिकाऱ्यांविरोधात वनविभागाने मोठी कारवाई करत १२ जणांना ताब्यात घेतले आहे. सामूहिक जंगल गस्ती दरम्यान उघडकीस आलेल्या या प्रकरणात शिकाऱ्यांकडून दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष आणि शिकारी साहित्य जप्त करण्यात आले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

👉 हे देखील वाचा : नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई; इंजिन व बोट स्फोट करून उद्ध्वस्त, १३ लाखांचे साहित्य जप्त

१९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास काही जण जंगलात शिकारीसाठी दबा धरून बसल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर  गस्ती पथकाने परिसरात तत्काळ सापळा रचला. दरम्यान, पाठलाग करत १२ संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे वन्यजीव संरक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक दिपाली तळमले , उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी, चौकीदार श्याम जंगमवार, तसेच नामाजी मडावी व देवाजी सलामे यांचा सहभाग होता.

जप्त वन्यजीवांचे धक्कादायक तपशील

या कारवाईत शिकाऱ्यांकडून वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले.
यामध्ये
४ शेकरू (Indian Giant Squirrel)
१ उडनारी खार
१ हरीनाल पक्षी
घुबड प्रजातीतील पक्षी
इतर वन्यजीवांचे अवयव

कायदेशीर कारवाई सुरू

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: कारचा चुराडा, चौघे गंभीर जखमी; कंटेनर चालक फरार

पुढील इशारा

वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जंगल परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे. अशा अवैध कृत्यांवर आगामी काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको