mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

snake rescuer cancer survivor python rescue Maharashtra | ७९% दिव्यांगत्वावर मात; सर्पमित्र बाळ काळणे यांनी १५ फूट अजगराला दिले जीवदान

शेअर करा :

snake rescuer cancer survivor python rescue Maharashtra : म्हैसपूर शिवारात १५ फूट अजगराचे धाडसी रेस्क्यू; कॅन्सरमुळे ७९% दिव्यांग असलेले सर्पमित्र बाळ काळणे यांची जिद्द आणि वन्यजीव संरक्षणाची प्रेरणादायी कहाणी.

snake rescuer cancer survivor python rescue Maharashtra
म्हैसपूर (जि.अकोला)  : एका हातात कॅन्सरचा रिपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या जीविताचा प्रश्न—अशा कठीण प्रसंगातही ज्याने स्वतःचा विचार न करता सापाला पकडून लोकांना भयमुक्त केले, तोच सर्पमित्र बाळ काळणे आजही तितक्याच जिद्दीने वन्यजीव संरक्षणाची सेवा करत आहे. कॅन्सरमुळे तब्बल ७९ टक्के दिव्यांगत्व आले असतानाही त्यांच्या सेवेत खंड पडलेला नाही. याच जिद्दीचे जिवंत उदाहरण म्हणजे म्हैसपूर शिवारात नुकतेच पार पडलेले १५ फूट अजगराचे थरारक रेस्क्यू.

👉 हे देखील वाचा : खामगावात DJ वादातून युवकाचा खून; बर्डे प्लॉट परिसरात खळबळ

२३ एप्रिलच्या रात्री अकोल्याजवळील म्हैसपूर शेतशिवारात शेती सपाटीकरणाचे काम सुरू असताना अचानक भलामोठा अजगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काम बंद होण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांनी तातडीने सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी कोणतीही तमा न बाळगता वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

वनरक्षक नितीन सावळे, राम काकडे, तुषार आवारे आणि प्रविण पवार यांच्या मदतीने, वनपाल गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू मोहीम सुरू झाली. अंधार, उंच-सखल जमीन आणि भुसभुशीत माती या प्रतिकूल परिस्थितीत अजगर पकडणे मोठे आव्हान होते. मात्र, टॉर्चच्या प्रकाशात बाळ काळणे यांनी धाडसाने पुढे जात अजगरावर नियंत्रण मिळवले. या मोहिमेत तुषार आवारे यांनीही मोलाची साथ दिली.
बाळ काळणे यांचा हा प्रवास सहज नव्हता. काही वर्षांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले, हातात रिपोर्ट असतानाच साप आढळल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या सापाला पकडत नागरिकांना दिलासा दिला. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी आपली सेवा अखंड सुरू ठेवली आहे. गेल्या ३० वर्षांत त्यांनी अकोला जिल्ह्यात ७० हून अधिक अजगरांना सुरक्षितपणे पकडून त्यांना जीवदान दिले आहे.

👉 हे देखील वाचा : मूर्तिजापूरात स्वतःहून हजर; पत्नीच्या खुनाची कबुली, आरोपी ताब्यात

या घटनेदरम्यान प्रकाश शेळके, महादेव मानकर, दत्ता मानकर, अमोल डेहनकर, राम शेळके, प्रणव निकोले आणि शाम शेळके या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून हा थरार अनुभवला. ग्रामस्थांनी बाळ काळणे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सेवेमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टळत असल्याचे नमूद केले.

जिद्दीसमोर संकटही हतबल

कॅन्सरमुळे शारीरिक मर्यादा आल्या, तरी निसर्गसेवेची तळमळ कमी झाली नाही. १५ फूट अजगराचे धाडसी रेस्क्यू करत बाळ काळणे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, जिद्द आणि सेवाभाव असेल तर कोणतेही संकट मोठे नसते.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या शोधात वन्यजीव गावाकडे येत असल्याने शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी थेट बाहेर साठवून ठेवावे, जेणेकरून वन्यजीवांना पाणी मिळेल आणि ते गावात येणार नाहीत, असे आवाहन बाळ काळणे यांनी केले. तसेच निसर्ग रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

“कॅन्सरवर मात करून वन्यजीव सेवेचा ध्यास”

काही वर्षांपूर्वी बाळ काळणे यांना कॅन्सर असल्याचे समजले, त्यावेळी त्यांच्या हातात वैद्यकीय अहवाल होता. मात्र त्याच वेळी साप आढळल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतःच्या आजाराची पर्वा न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापाचे रेस्क्यू केले आणि नागरिकांना भयमुक्त केले. कॅन्सरमुळे ७९ टक्के दिव्यांगत्व आले असतानाही त्यांनी आपली सेवा थांबवली नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्यांनी सातत्याने वन्यजीव संरक्षणासाठी काम करत अकोला जिल्ह्यात ७० हून अधिक अजगरांना सुरक्षित जीवदान दिले आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे आणि सेवाभावामुळे ते आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

“वाढत्या तापमानाचा वन्यजीवांवर परिणाम”

सध्या वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगलातून बाहेर पडून गावांकडे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी थेट बाहेर साठवून ठेवावे, जेणेकरून वन्यजीवांना पाणी मिळेल आणि ते गावात येणार नाहीत. निसर्ग रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन सर्पमित्र बाळ काळणे यांनी केले आहे.

प्रतिनिधी : महालोकवार्ता

👉 अकोल्यासह परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा: विदर्भ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको