Khamgaon DJ fight murder : खामगावच्या बर्डे प्लॉट येथे लग्नसमारंभात DJ वर नाचताना झालेल्या वादातून 23 वर्षीय शोएब खानचा धारदार शस्त्रांनी खून. परिसरात दहशतीचे वातावरण.


खामगाव : शहरातील बर्डे प्लॉट परिसरात एका लग्नसमारंभादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे भीषण रूपांतर खुनात झाले. २५ एप्रिल रोजी रात्री डीजेवर नाचताना झालेल्या धक्क्यावरून वाद उफाळून येत चार ते पाच जणांनी २३ वर्षीय युवकावर धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून त्याला जागीच ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान (वय २३, रा. बर्डे प्लॉट) असे मृत युवकाचे नाव आहे.
👉 हे देखील वाचा : मूर्तिजापूरात स्वतःहून हजर; पत्नीच्या खुनाची कबुली, आरोपी ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमी जवळ एका लग्न समारंभात डीजे सुरू असताना युवक नाचत होते. यावेळी शोएब खान अमीन खान नाचत असताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत होत परिसरातील चार ते पाच जणांनी संगनमत करून शोएब खान याच्यावर धारदार शस्त्र तसेच लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत झाला.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, या वृत्ताचे लेखन होईपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
👉 हे देखील वाचा : निंभा अंधश्रद्धा प्रकरणात आरोपी अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
किरकोळ धक्का ठरला जीवघेणा
डीजेवर नाचताना झालेल्या क्षुल्लक धक्क्यावरून उफाळलेला वाद काही क्षणांतच हिंसक बनला आणि एका तरुणाचा बळी गेला. या घटनेने सण-समारंभातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


