mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Samruddhi expressway accident tyre burst | समृद्धी महामार्गावर टायर फुटून स्कार्पिओ पलटी; कारंजा जवळ पाच जण जखमी

शेअर करा :

Samruddhi expressway accident tyre burst : कारंजा जवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओचा टायर फुटल्याने अपघात; वाहन पलटी होऊन पाच जण जखमी. रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली.

Samruddhi expressway accident tyre burst

कारंजा : समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या अपघातात स्कार्पिओ वाहनाचा समोरील टायर अचानक फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरला धडकून पलटी झाली. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

👉 हे देखील वाचा : अकोला-पातूर मार्गावर भीषण अपघात : लग्नाच्या पत्रिका वाटताना दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, काशी विश्वनाथवरून गुजरातमधील वापी येथे जाण्यासाठी निघालेली स्कार्पिओ (क्र. जीजे ०५ जेओ १३५३) सकाळी साडेसातच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १६७ वर पोहोचली असता समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन डिव्हायडरला धडकले आणि एक पलटी झाली.

या अपघातात शोएब खान (वय ३५), खुशबू निसा शोएब खान (वय ३०), अरमान खान (वय १२), जिशान खान (वय १०) व येराना खान (वय ८, सर्व रा. वापी, गुजरात) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील १०८ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पायलट आतिश चव्हाण व डॉ. नीलेश राठोड यांनी जखमींना प्राथमिक उपचार देत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मस्के यांनी जखमींवर उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर केले. या मदतकार्यात श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख, समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार, आई एकवीरा रुग्णवाहिकेचे विनोद खोड, कक्षसेवक विजय शिरसाठ तसेच अधिपरिचारिका पल्लवी यांनी सहकार्य केले.

👉 हे देखील वाचा : वाशिम भीषण अपघात: लग्नासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वेगवान मदतकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली

अपघातानंतर तात्काळ पोहोचलेल्या रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे जखमींना वेळीच उपचार मिळाले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिनिधी : महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको