mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Balapur Wadegaon road accident bike car collision | वाडेगावजवळ भीषण अपघात; दुचाकी-चारचाकी धडकेत तिघे गंभीर

शेअर करा :

Balapur Wadegaon road accident bike car collision : बाळापूर-वाडेगाव मार्गावरील बाग फाटा येथे दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी. 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलवले.

Balapur Wadegaon road accident bike car collision
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील बाग फाटा परिसरात रविवार २६ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्गावर टायर फुटून स्कार्पिओ पलटी; कारंजा जवळ पाच जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर–वाडेगाव मार्गावरील बाग फाटा नजीक बटवाडी परिसरातून एक दुचाकी मुख्य मार्गावर येत असताना, बाळापूरकडून वाडेगावकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाशी (क्र. एमएच ०२ ईके ३३४१) तिची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. या मदतकार्यामध्ये धनेगाव येथील पोलीस पाटील प्रमोद लांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात मदत केली.

👉 हे देखील वाचा : अकोला-पातूर मार्गावर भीषण अपघात : लग्नाच्या पत्रिका वाटताना दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

या घटनेची माहिती संबंधित पोलीस विभागाला देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जखमी हे बाळापूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

प्रतिनिधी : महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको